Tuesday, September 6, 2011

गावात माझ्या...

पहाल जिकडं
दिसल तिकडं
छोटी मोठी टेकडं
गावात माझ्या...

शेत रे नागडं
आभाळ कोरडं
लटकले मरदं
गावात माझ्या...

डाक्टराचं त्वोंडं
पाहिलं न धडं
सेवा हाये गोडं!
गावात माझ्या...

आलं जरी पिकं
मिळलं का भाव?
दलालाचा रोग
गावात माझ्या...

थोडी पडलीया भितं
पण मोठी ईमारतं(!)
न्हाई मास्तरं फकतं
गावात माझ्या...

लई हाये रे तर्रासं
त्याले गुमान सोसूनं
लोकं राहती हासूनं
गावात माझ्या...