Wednesday, July 25, 2012

घालमेल

जेव्हा व्यवहारवादाचे पिशाच्च,
भेसूर हास्य करीत
बसतं सामान्याचा मानगुटीवर
अविरत चाललेल्या गोष्टी
पुन्हा डोकी वर काढू लागतात,
वाटच बघत असतात त्या
कुणाच्या मनातली भिती
जाते अमाप पराकोटीला
उधाणतो प्रेमाचा सागर
पुनवेची ददात न ठेवता
गावी नसलेल्या संकल्पना
सत्य ठरू लागतात,
अपुल्याच भावनीक परीघात
नुकतच बाळसं धरलेलं
रांगणारं पोर,
उभं राहत नाही कधीच
कारण तेव्हा
एक समर पेटतं बेभान
अपुल्याच मुल्यांचं
-शोधग्राम, 
 गडचिरोली

Tuesday, July 24, 2012

Long Ago

You have been so kind
holding my hands in storm wind
You are the one who cares for me
dude to share the secrets of me
You are the best friend I ever had
Far away you and here I am sad
But the distance is only of some miles
You are deep rooted in my each and every smiles
Emotions these I never let go
Thinking about you
dont know how
I go 'long long ago...'
(From old poems)

कधी कधी...

कधी कधी वाटतं
पर्जन्यासव व्हावं
आसरा नसे तेव्हा
उगाच बरसून जावं
कधी कधी वाटतं
भ्रमरासव व्हावं
मकरंद संपता
दुज्यावर झुलावं
कधी कधी वाटतं
नौकेसव व्हावं
जीवनसागरा
तरंगत जावं
कधी कधी वाटतं
दर्पनासवं व्हावं
मनात नच ठेवता
सत्य सर्व दाखवावं
कधी कधी वाटतं
कवीसव व्हावं
मनी भावनेला
कविता करावं
(सुरुवातीच्या कविता)