येथे कुणाची दुखे कुणी न पाहिलेली
जो तो खुशीत अपुल्या मदमस्त जाहलेला ||
ते भव्य दिव्य सारे प्रासाद सोडूनिया
मी शोधण्या निघालो माझीच छत्रछाया ||
वाटेत आंधळ्याला उगीच विचारले मी
दिव्यदृष्टी त्याची मज लागली छळाया ||
रात कैक सरल्या सदोदीत चालण्यात
तेव्हा कुठे प्रकाश मी लागलो पहाया ||
ह्या भग्नावल्या जगात नाही महाली थाट
ते चोचले फुकाचे मज वाटे मोहमाया ||
रानातल्या फुलांनी मज काय जादू केली
का येथल्या कणांणा मी लागलो जपाया ||
नाही मला कळाले हा काय घोळ झाला
तो आंधळा म्हणाला तुज लागले दिसाया ||