नियतीच्या खेळामध्ये मी, डाव माझा मांडला
उध्वस्त झालो तरिही, मी श्वास नाही सोडला ॥धृ॥
लोक म्हणाले तुजसाठी, वेळ नाही लाघवी
तिजपासून वाचायचे, सोंग कर काही तरी
मी वेळ तोच निवडला,
पण श्वास नाही सोडला ॥1॥
घाव कैक झाले, देह काया रक्ताळली
पापण्यांच्या पलीकडे, आसवेही गोठली
हर एक घाव सोसला
पण श्वास नाही सोडला ॥2॥
लोक हासले मला, कुणी आळशी संबोधले
जगताच्या शाळेत ह्या, गणित माझे चुकले
बलत्कार माझा राजरौस जाहला,
पण, मी श्वास नाही सोडला ॥3॥
आपल्याच मनाशी ह्या समर पेटले नवे
जखमांची घ्यावी ऊर्जा वा, परजयास घ्यावे कवे
हा मार्ग का पत्कारला,
का श्वास नाही सोडला? ॥4॥
No comments:
Post a Comment