चल रे माझ्या जीवा जरा करूया रे काम
गाऊ सुरेल भजन घेऊ थोडं हरीनाम ॥ध्रु॥
दुःख जगी कोणा देवा मुकले कधिना
तरी लोक म्हणे माझी एकल्याची दैना ।
देगा त्यांना देवा समज जराशी
घाम दुःखाचा देई किम्मत सुखाची ॥
रोज नवे काही तरी मागतो माणूस
मुळासकट कधी कोणी खातो का रे ऊस ।
हाव आली गरजेचा नेसूनीया सदरा
दाव देवा आता मला समधानी चेहरा ॥
ज्याला त्याला आहे देवा अकड धर्माची
सारे धर्म सांगे सदा महती प्रेमाची ।
ज्याने स्वतः प्रसवली धर्म-जात-भाषा
त्याला उरे फक्त देवा माणुसकीची आशा ॥
लोक म्हणे तुझा-माझा वेगळाची देव
पुसा त्यांना कुणी दिले देवालाही नाव ।
माणसात आहे देव दानवही त्यात
तुम्हा हाती आहे कोणा पुजावे मनात ॥
No comments:
Post a Comment