टॉर्चच्या उजेडात
प्रचंड राडा असलेल्या ठिकाणी
हातात काडी घेऊन
मातीमध्ये पडलेली सोन्याची नथणी शोधावी
तसं
अगतिक होऊन
कुणी तपास घ्यावा
हिजड्यासारख्या टाळ्या वाजवणार्या
संसदेहून मोठ्या गदारोळात
लाजीरवाण्या त्रयस्थ भावनेनं
मीही सामील व्हावं
बर्याच वेळ जीव मुठीत धरूनही
मातीवर सरपटणार्या
त्या कपाळकरंटकाला
थोड्या हालचालीचा मोह व्हावा
आणि नेमक्या त्याच क्षणाला
वीज चमकावी...
काडी तुटावी...
आणि
टॉर्च विझाव्यात....
No comments:
Post a Comment