Wednesday, April 20, 2011

प्रवास

येथे कुणाची दुखे कुणी न पाहिलेली
जो तो खुशीत अपुल्या मदमस्त जाहलेला ||

ते भव्य दिव्य सारे प्रासाद सोडूनिया
मी शोधण्या निघालो माझीच छत्रछाया ||

वाटेत आंधळ्याला उगीच विचारले मी
दिव्यदृष्टी त्याची मज लागली छळाया ||

रात कैक सरल्या सदोदीत चालण्यात
तेव्हा कुठे प्रकाश मी लागलो पहाया ||

ह्या भग्नावल्या जगात नाही महाली थाट
ते चोचले फुकाचे मज वाटे मोहमाया ||

रानातल्या फुलांनी मज काय जादू केली
का येथल्या कणांणा मी लागलो जपाया ||

नाही मला कळाले हा काय घोळ झाला
तो आंधळा म्हणाला तुज लागले दिसाया ||

No comments:

Post a Comment