Friday, April 20, 2012

सुर्योदय

गावतळ्याच्या बांधावरती
दोन तरूंच्या मधोमधी मी
असाच बसूनी पाही एकटक
वाट रवीची...

पळस काहीश्या ऐटीत तेथे
लाल फुलांनी रंगला होता 
सजला ऐसा, जैसा बघतो तोही
वाट रवीची...

पक्षी फुकूनी शीळ मनोहर
घेत भरारी हळूच म्हणती, ये जागावर
दूर नोहे बघ जवळ आली
वाट रवीची...

काय पहावे काय नाही अन
सैरभैर मन झाले तोवर
खार म्हणाली कानी माझ्या, सरली वेड्या
वाट रवीची...
-अतुल
9/3/12
गडचिरोली
 

No comments:

Post a Comment