नेहमी
सारखीच आज पण सकाळ झाली
छान
होती. बॅकग्राउंडला
बासुरी वाजावी अशी...
इतक्यात
पानगळ सुरू झालेली
आरपार
जंगल
पक्ष्यांचा
मधूर रव
प्रेरणादायी
सूर्योदय
सगळं
काही परफ़ेक्ट कॅटेगरीत मोडणारं
...
खरंच
का...?
अरे
हट !
...
बासरीचा
सूर बिघडलेला होता
अदृश्य
अश्रूंची पानगळ होती
विचारांचे
कोलाहल
एखाद्या
नभाएवढ्या घनाने
शिरमाथ्यावर
घाव व्हावा तसे
करत
होते शेकडो भावनांचे स्फोट
आणि
सूर्य हसत होता
अगदीच
क्षुल्लक भावनेने
माझ्याकडे
पाहून...
No comments:
Post a Comment