भयाण सुंदर रान बहरले
आणिक ईकडे या तळ्याच्या
माणसांचे शहर वसले.
या तळ्याच्या असे दुरवर
गाव तिळाच्या दान्या इतुके
अल्याडची परि विशाल सदने
शहरांच्या वक्षात खडे
या तळ्याच्या अलिकडे ह्या
मोटरगाड्या अन कॉम्प्युटर
आणिक तिकडे धान घ्यावया
नसे त्यांच्या हाती चिल्लर
अलिकडचे ते बाळ बापडे
सुज्ञ व्हावया शाळा शिकते
पल्याडची परि बन्द शाळा
शतकांची जशी वाट पहाते
शहरांच्या रस्त्यावर होती
धरणीमाता कुंठत बसली
मीठीत घेऊन चुंबून तिजला
गाव दिलासा देत आजही
असे चुकीचे पल्याड काही
अलिकडे जसे काही बरोबर
एक युगात एक तळ्यात
सोबत तरिही कितीक अंतर
मीन जळातील वदले सारे
सुखी भले ह्या तळ्यात आपण
तोच थेट गळ मुखी पडावा
कोण पुसे मग आला कोठून?
No comments:
Post a Comment