Tuesday, November 8, 2011

आकर्षण

जुनाट जखमेपरी सलणारी
विचारांची स्फोटके
जीव कंठावा सुखाने
सांगणारी सुचके 

अशीच वेळ अवेळ होता
एक चपला सांडते
ओलीचिंब सारी होई
पावसात गणिते

कधी हवेच्या संगतीला
मधुरसा मृद्गंध असे
अजाणत्याला पुढे परि
सहवासाचा नाद छळे

कमलदलावर कधी पाण्याचा
मोती जसा उपरा दिसे
औदुंबर कधी गहिरा
थेट काळजात ठसे

No comments:

Post a Comment